18:58
का होत नाही धरणीकंप
का स्फुटत नाही ज्वालामुखी
का येत नाही त्सुनामी
घ्याया कवेत अवनी
कुठला खदखदतोय लाव्हा
कोणता जळतोय हा सूर्य
कोण तटतटतोय पान्हा
कोणता लुचाया कान्हा
जन्माया हा धडपडे गर्भ
वांझ कळांची त्याला साथ
काही केल्या सुटेना नाळेचा फास
काही केल्या तुटेना उदराचे पाश
धरणी कधी फुटणार नाही
लाव्हा गरळ ओकणार नाही
पान्हा कधी झरणार नाही
सल कुठला तो सरणार नाही
Sunday, November 21, 2010
Subscribe to:
Posts (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलाय . संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला . सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती ...