Friday, September 25, 2015

विनोदी साहित्याला स्टेटस

विनोदी लेखनाला मराठी साहित्यात कधीच उच्च दर्जा (elite status!) मिळत नाही.

वेदनेचं धुकं बाजूला सारून अश्वत्थाच्या भळाळत्या रक्ताचा उगम समजावून सांगणा-या लिखाणाला निश्चितीच फार महत्व अाहे, पण त्याच रक्तात भिजलेली जिवणी फाकवण्याचं सामर्थ्य असणा-या लेखनाची ताकद काही वेगळीच असावी लागते

(अाताच लक्षात अालं की काळ्या डोहातल्या जळात बसलेल्या अौदुंबरा इतकीच ही अशवत्थाची संतत भळाळती जखम मला भावून राहिलेली अाहे.
असंही जाणवलं, अात्ताच, की ह्या संतत जखमेतून सतत वाहणा-या रक्ताने कधी कुठला पदर भिजलेल्याचं किवा एकादं धोतर रक्तम झाल्याचं एेकिवात नाही ! )

Monday, September 21, 2015

राजा, राणी आणि ...

आपलं मन
काळ्या कुट्ट
गच्च घट्ट
नक्षीदार पेटीत 
कुलपबंद करून
ती किल्ली
क्षितीजापार फेकून
राजा लढाईला निघाला

खरंतर त्याला
राणिचा जीव
न्यायचा होता
खांद्यास खांदा
तसा असावा
जीवास जीव

राणीने दिला
स्पष्ट नकार, 
"काहीबाही
बरंवाईट झाल्यास
प्रजेला असेल 
माझी गरज"

राजा चमकला
चिंतीत झाला
विचार केला
ठेवावा मागे
डोळा इथेच,
……
सोबतही होईल

डोळा एकटा
फक्त पाहणार
कळणार काहीच नाही
म्हणून मदतीला
ठेवावं मन
कुलुपात सुरक्षित

एकाक्ष राजाचं
मन नसलेल्या लढाईत
जे व्हायचं तेच झालं.
मागे तिकडे
किल्ली शोधायला
कुणी गेलंच नाही

आजही पडून आहे
ती किल्ली
माझ्या पायाशी

::::::::::::::::::::::::

राजाचं
चुकलंच म्हणा
हक्क
गाजवायला हवा होता
राणीवा
जीव न्यायला हवा होता
तसंही
तिच काय बिघडणार होतं
स्त्रीशरीराला
ताकद असतेच की
अगदी
जिवाशिवायही









Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...