तू म्हणालास
की
रडतानाही तू माझ्याबरोबर
असतोस
माझ्याच.
हो नं
?
पण अरे,
माझ्या रडण्याचं काय
रे
ते बसलंय तिकडे
कोपऱ्यात
एकटंच.
इच्छा असेल तर
बघ
त्याला जवळ घेता येतंय
का
आपलंस करता येतंय
का
आपलं वाटतंय
का
मग हसेल कदाचित
ते
खुद्कन्
आणि विचारेल
तुलाच
"कोण, काय, कसलं
रडणं?"
नाहीतर
आहेच
तू, मी
तुझ ते बरोबर
असणं
माझं कोपऱ्यात
बसणं