मित्राबरोबर
चहा प्यायला निघालो
वाटेत बारिकशी
खरेदी केली
दुकानदाराने
विचारले, "साहेब,
बिल देऊ
का? टॅक्स पडेल"
म्हटलं, "उगीच कशाला
मी काही
व्यावसायिक नाही"
पुढे निघालो
कॉफी प्यायला
वाटेत
इतके खड्डॆ !!
पाठ पिचून
निघाली
जीव आंबून गेला
तरी कसेबसे
पोचलो
दुखऱ्या पाठीने
नि
गरम चहाने
आंबलेल्या
मनाला
तुंबलेल्या
रागाला
धुमारे फोडले
बघता बघता समोर
ड्रॅगन दिसू
लागला
आग ओकू लागला
हपापलेले नेते
लाचखोर अधिकारी
खाबू कर्मचारी
नफेखोर
कॉंट्रॅक्टर
सगळेच साले
बेपर्वा
बेमुर्वतखोर
काम कमी नि
करप्शन जास्ती
कधी काम नाहीच
सगळा मालामाल
पुन्हा त्यावर
टॅक्सही नाही
टॅक्स
टॅक्स !!!!!!!!
आणि माझ्या
डोळ्यांसमोर
त्या ड्रॅगनचा
झाला
आरसा
बघवेना मला
घेतला हातोडा
फोडला आरसा
खळ्ळ् खट्टाक
त्या आवाजाने
भ्रष्ट
अधिकाऱ्यांची मारली
ड्रॅगन शांत
झाला
पाठ दुखायची
थांबली
आम्ही पुन्हा
फक्कड
चहा मागवला
बिनबिलाचा