फ्रीडम अोफ स्पीच
(ढिश्शयाँव्, फट्टॅक् ….)
ए भाडू, …..बोल ना
एय तिच्च्या, बोल ना
हाये की नाय आमच्याकडे
फ्रीडम अोफ स्पीच
ए उलट्या आंडाच्या
बोल ना रे साल्या
:
अॉ काय म्हन्तोस्?
बोलता येनार न्हाही?
तोंडात बोळा हाय म्हनून
अॉ, मग तुझ्या त्वोंडात
बोळा न्हाय घालनार तर
कोंबडीची तंगडी घालनार
का पुरनपोळी घालनार
काय ररं रांडेच्या !!!
ह्हाााा, सांगून ठ्येवतोय
तो द्येव आहे माझा,… काय
त्येच्या विरोधात
येक शब्दबी खपनार नाय
ह्ह्ह्ाााााा
तिच्या आयला तिच्या रे
गांडीत दम असेल तर
तिकडे मक्केला जाउन
बोलून दाखव ना रे
एएए काळतोंड्या
सूडो श्येकुलेरिश्ट साला
आमी बोलून देतो म्हनून
काय बी बोलायचं काय रे
देवाच्या विरोधात बोलतोस
तुझी अौकात काय रं डुकरा
(ढिश्शयाँव्, फट्टॅक् ….)
जा आता, नीट राहा
नीट ध्येनात ठ्येव
काय बी बोलायचं
पन नीट बोलायचं
फ्रीडम अोफ स्पीच हाये !