बाई गं
नको सारखी रडूस
नको कोमेजू हिरमुसू
हिरमुसणे नि कोमेजणे
दोन बाजू आहेत
एकाच तर नाण्याच्या
थांबव तुझं नाचणं
फेकल्या नाण्यांच्या तालावार
थुईथुई छन् छन्
नाच तुझाच नाच
मग बघ नाणी कशी
डोलतात तुझ्या पायांशी
राहू नाकोस चाकं
हो पाॅवरफूल इंजिन
गाडीला हाकाणारं
सतत हताश
मान खाली डोळे भकास
पाहवत नाही अगदी
स्स्स्सो
कमाॅन
चीअर अप
जंप हाय
गिव्ह हाय 5
अॅण्ड
हॅव अ ब्लास्ट