Tuesday, May 12, 2009

आवशीची

पुनवेचं कोण कौतुक
तिच्या झिरझिर तारुण्याचं
झालच तर तारुण्यसुलभ
आसक्त चौदवीचं

पण चांदोबाळाला जन्म देऊनही
आवसेची मात्र अवदसा केलेली
तिचं तोंड काळं करून
वेशीबाहेर फ़ेकलेली

अशा आवशीची तू लेक
पुढेपुढे न करणारी
असूनही न दिसणारी
दिसूनही न दिसणारी

आपलं हासू मैत्रिणींना देऊन
फ़डफ़ड पापण्या रिझवणारी
माझ्या तप्त सूर्याशेजारून
स्निग्धहास्य पाझरणारी

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...