एक अनाकल हुरहूर
डोळी टपटपलेले पाणी
अंधुक अबोल हाक
समोर आठ्य़ांचे उत्तर.
मिळाली नाही तिला
दिवसाची सोबत
आरक्त डोळे, उन्मत्त शरीर
वक्षावर विसावलेली बोटं
त्यांना गारबधीर बर्फ़स्पर्श
फ़िरवलेली कूस.
मिळाला नाही त्याला
रात्रीचा संगत
मिटलेले चार डोळे
भळभळ उघडी हृदयं
एकमेक गेले लांब
उरली अश्वत्थाची सोबत
बाहेर नीरव शांतता
आत तडफ़ड तगमग कल्लोळ
पहाट झाली
चंद्रराज उगवले
प्रेमराज्याची हवाल
पहायला निघाले
हातात शुभ्रशीतल कंदील
सोबत एकतारी नारद
थकली गात्रे
चेतवू लागले
शमली आग
पेटवू लागले
मिटले डोळे
हसवू लागले
लांब दूर इथे
एकतारी सूरावट
अश्वत्थाची सळसळ
पापण्यांआड उघडे डोळे
धुमसती बर्फ़ाळ आग
फ़ुरफ़ुरणारी ज्योत
नारदाला राहवलं नाही
काडीऐवजी टाकला हिरवा कोंब
आशेने इथे उसळेल डोंब
निशाधिशाला पाहवलं नाही
मिटल्या डॊळ्यांनी शीतल नजर
प्रेमाचा पुन्हा होईल कहर
दूता देवालाही न कळे
अंतरीची ठाव
बाईच्या हो पान्ह्याला
कशी दूधाचीच आच
पोटुशीला होई पोट जड
वांझोटीला त्याचीच आस
Monday, June 29, 2009
गोडुली
इटुकली पिटुकली
पटकन् टपकली
एवढीशी चिमुकली
केवढीशी धिटुकली
धाव धाव धावली
तरी नाही दमली
धपकन पडली
तरी नाही रडली
सानुली गोडुली
सायीची बाहुली
पटकन् टपकली
एवढीशी चिमुकली
केवढीशी धिटुकली
धाव धाव धावली
तरी नाही दमली
धपकन पडली
तरी नाही रडली
सानुली गोडुली
सायीची बाहुली
Friday, June 5, 2009
Thursday, June 4, 2009
माफ़ी
मी:
मागे एकदा तुला म्हणालो होतो
"मला माफ़ कर"
तू मान फ़िरवून निघून गेलीस
एक हळवा पापा घॆऊन
माफ़ी मिळाली की नाही ते
मला कळलंच नाही
तू:
मागे एकदा तुला म्हणाले होते
"मला माफ़ कर"
तू फ़ाडकन थोबाडीत मारलीस
आवेगाने मिठीत घेतलस
माझॆच अश्रू घोट घोट पीत
मी समर्पित झाले
मागे एकदा तुला म्हणालो होतो
"मला माफ़ कर"
तू मान फ़िरवून निघून गेलीस
एक हळवा पापा घॆऊन
माफ़ी मिळाली की नाही ते
मला कळलंच नाही
तू:
मागे एकदा तुला म्हणाले होते
"मला माफ़ कर"
तू फ़ाडकन थोबाडीत मारलीस
आवेगाने मिठीत घेतलस
माझॆच अश्रू घोट घोट पीत
मी समर्पित झाले
Subscribe to:
Posts (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
A lover deeply in love said to beloved, "Oh, my dear, I can't live without you". The beloved deeply in love too, replied, ...
-
In the wee hours of early morning a sweet cute puppy was born on a street. Next morning an equally sweet and cute young girl woke up to the ...
-
A young girl met with a severe road accident. The accident was so bad that nobody expected her to survive. But she did, just enough. Just en...