Monday, June 29, 2009

ठाव

एक अनाकल हुरहूर
डोळी टपटपलेले पाणी
अंधुक अबोल हाक
समोर आठ्य़ांचे उत्तर.
मिळाली नाही तिला
दिवसाची सोबत

आरक्त डोळे, उन्मत्त शरीर
वक्षावर विसावलेली बोटं
त्यांना गारबधीर बर्फ़स्पर्श
फ़िरवलेली कूस.
मिळाला नाही त्याला
रात्रीचा संगत

मिटलेले चार डोळे
भळभळ उघडी हृदयं
एकमेक गेले लांब
उरली अश्वत्थाची सोबत
बाहेर नीरव शांतता
आत तडफ़ड तगमग कल्लोळ

पहाट झाली
चंद्रराज उगवले
प्रेमराज्याची हवाल
पहायला निघाले
हातात शुभ्रशीतल कंदील
सोबत एकतारी नारद

थकली गात्रे
चेतवू लागले
शमली आग
पेटवू लागले
मिटले डोळे
हसवू लागले

लांब दूर इथे
एकतारी सूरावट
अश्वत्थाची सळसळ
पापण्यांआड उघडे डोळे
धुमसती बर्फ़ाळ आग
फ़ुरफ़ुरणारी ज्योत

नारदाला राहवलं नाही
काडीऐवजी टाकला हिरवा कोंब
आशेने इथे उसळेल डोंब
निशाधिशाला पाहवलं नाही
मिटल्या डॊळ्यांनी शीतल नजर
प्रेमाचा पुन्हा होईल कहर


दूता देवालाही न कळे
अंतरीची ठाव
बाईच्या हो पान्ह्याला
कशी दूधाचीच आच
पोटुशीला होई पोट जड
वांझोटीला त्याचीच आस

1 comment:

Gaurav said...

Hi.
Truly Liked The Poem very Much.
Chhaanch Lihali Aahe.

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...