Thursday, May 6, 2010

सायंस्पर्श

अजून संध्याकाळ रेंगाळते आहे; तिला पृथ्वीचा स्पर्श सोडवत नाही. तिचे सोनरेशमी हात पृथ्वीच्या गळ्यात अशकले आहेत. तिच्या स्पर्शाने वाळूसुद्धा शहारली आहे. आज माड मोरपिसे आहेत . . . आता अंधार नाही. फ़क्त त्यांचा परर्परांना होणारा स्पर्श तवढाच शिल्लक आहे. निजलेल्या मुलाच्या अंगावरचा हात आईने हळूहळू काढून घ्यावा तशी संध्याकाळ आपला हात हळूहळू काढून घेत आहे. तिची बोटे निवलेली आहेत, अबोध स्पर्शाने भारलेली आहेत

- विंदा - ’स्पर्शाची पालवी’ मधून, संकलन: सरिता आवाड, मुंबई


-साभार ’मिळून साऱ्याजणी’ , मे, २०१०

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...