मी एकदा स्वर्गातून परत येत होतो
तेव्हा तू मला पाहिलंस नि विचारलंस
"काय रे, कुठे गेला होतास?"
मी म्हटलं, "स्वर्गात गेलो होतो"
"व्वा! बोलला नव्हतास जाणरेयंस असं",
तू आश्चर्यचकित होऊन म्हणालीस
मी उत्तरलो, "मी तरी कसा सांगणार.
देवाने स्वत: बोलावलं नि नेऊन आणलं
त्याची गोष्ट त्याने सांगायला हवी"
नंतर एकदा मी नरकातूने येत होतो
तिथल्या खास नरकयातना भोगून
तेव्हाही तू मला पाहिलंस नि
लांबूनच हसत हसत विचारलंस,
"व्वा! पुन्हा स्वर्गातून येतोयस वाट्टं"
मला याचं अतिशय वाईट वाटलं
दुःखात असताना तुला आनंदात वाटलो
अशी कशी तुला मूलभूत नाही समज
दुःख नि आनंद यातला कळत नाही फरक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलाय . संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला . सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती ...
No comments:
Post a Comment