Thursday, March 8, 2012

पुरुष

लाल बत्तीखालच्या सगळ्या छात्या
नसतात कधी व्यवस्थित झाकलेल्या
किंवा नीट पूर्ण उघड्या

भिती असते त्यांना
माल दिसला नाही तर बहुदा
गिऱ्हाईक रस घेणारच नाही

दिसायचं ते सगळं आधीच दिसलं
तर बघायला रस काय उरणार
झिरमिळी पडद्यामागे का येणार

निळे ओठ जांभळ्या भुवया
अर्धअनावृत्त थलथलणारे स्तन
लवलवणारी लसलसणारी ताठ शिस्न

भावनांची सगळी सुंदर वस्त्र
फाडून जाळून नष्ट केली की
उरतो हा उघडा रेड लाईट एरिया

आणि तरीही तेव्हाही तशातही
लोंबणाऱ्या वक्षांमध्ये आणि
वखवखणाऱ्या लिंगांमागे

असेतच भावनांची उत्कटता
विस्थापित विकृत विद्रूप
उलट्या घातलेल्या अंडरवेअरसारखी

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...