एकदा एका यक्षाला
विचित्र शाप मिळाला,
काहिही बोलला तो
नाही कळणार जगाला,
अर्थ एक उच्चारतो
वेगळा कळे इतरांना.
अस्वस्थ मनाने
भांबावून फिरे तो,
काय करावे कळेना
काय उःशाप याला.
भेटला त्यास ऋषी
सांगितला एक मंत्र,
जाऊन शरण शापाला
तो कविता करता झाला
No comments:
Post a Comment