ज्ञानाची आस ही अश्वत्थाम्याच्या भळभळणा-या जखमेसारखी आहे - संतत, निरंतर. अनंतमितीय भूमितीय आकारासारखी. एक बिंदू, आणखी एक बिंदू, आणखी आणखी एक बिंदू, बिंदूपुढे बिंदू, बिंदूशेजारी बिंदू, बिंदूभोवती बिंदू, बिंदूत बिंदू, बिंदूतल्या बिंदूत बिंदू. ना रुंदी, ना लांबी, ना जाडी, ना आकार, केवळ पसार. अनंताकडे, शून्याकडे. शून्यातून अनंताकडे, अनंतापार शून्याकडे. अनंत आवर्तने, अनंत दिशांनी.
शून्याच्या गर्भात आणि अनंताच्या देहापार. पंचमहाभूतांचे उश्वास आणि पंचेंद्रियांचे श्वास. अनादी नादावर स्वार होऊन प्रकाशाहून वेगाने, केवळ प्रवास.
No comments:
Post a Comment