धगधगते शिवधनुष्य
जिवंत होऊन उठले
मला त्याने राम केले॥
आग ओकी रवी
खाली मगरमिठी
मध्ये उभा मी
डळमळत्या पायांनी ।
हाती आले पवित्र झाले
कसनुसे तोलून धरले
थरथरत्या रक्त ओठांनी
हृदयी बिलगून धरले ।
होता माझा दगड
आला त्यात अनाहत नाद
ताणला माझा जीव
त्यातून उमटे टणत्कार ।
परीस हो माझा तू
सोनं व्हायचंय मला
मोरपीस हो गालावर
परी व्हायचंय मला ।
दगडाचा देव होतो
झळाळतो जेव्हा
देव स्वतः पूजतो
दगडातला देव
No comments:
Post a Comment