Tuesday, May 25, 2010

बारा कोस

दर बार कोसांवर भाषा बदलते म्हणतात. भाषा ही नदी सारखीच असते एखाद्या. इथे अशी दिसते, तिथे तशी दिसते, इथे अशी वाटते, तिथे तशी . . . .
पण आजकालच्या standardization च्या जमान्यात लोकांना ना अशा बारा कोसांची पर्वा ना इच्छा.

’अनुभव’ च्या हाराष्ट्र विशेषांकात त्यांनी या बारा कोसांना नेमकं शब्दांत पकडायच प्रयत्न केला आहे. निवडक लोकांना त्यांनी ’आमची माणसं’ हा विषय देऊन त्यांच्यात्यांच्या बोली भाषेत लिहून घेत्तलं. महाराष्ट्रातच्या पूर्वपश्चिम, उत्तरदक्षिण कोपऱ्यांतून कोकणि, वऱ्हाडी, खानदेशी, मराठवाडा, कोल्हापूर-सोलापूर, नंदुरबारचा सातपुड्याचा भाग अशा अनेक बोलीभाषेंमधलं बोलणं वाचताना जाणवतं की म्हटलं तर भाषा एकच आहे पण तिची किती सुंदर सुम्दर रूपं आहेत ही! अशा सगळ्य़ांना एकाच प्रमाणात बांधणं पूर्णपणे चुकीचं आहे. उलट असे मार्ग शोधणं आवश्यक आहे की ज्यायोगे आपल्या सर्व बोलीभाषा जिवंत बहरत्या तर राहतील आणि त्याच वेळी सर्व बोलीभाषां बोलणऱ्या लोकांना एकमेकांशी संवादही साधता येईल.

Thursday, May 6, 2010

संत

ह्यांना कधीकधी करुणेचे झटके येत असत. त्याची कागलच्या मुक्कामातील एक आठवण : हे एकदा सहज मुलांच्या वसतिगृहात गेले. तिथे त्यांना एक सतरा-अठरा वर्षांचा विद्यार्थी रडताना दिसला, हे त्याच्या जवळ गेले, अंगाला हात लावला, तर त्याच्या अंगात ताप होता. हे त्याला ताबडतोब घेऊन घरी आले. आता आमच्या घरात आमची दोन लहान मुलं वय तीन आणि एक. शिकायला असलेला चौदा वर्षांचा भाचा बपू, धाकटी बारा वर्षांची नणंद सोनी. म्हातारपणने भ्रमिष्ट अवस्थेत असलेले सासरे आणि भरीत भर माझी नोकरी. पण आजारी पोर घरी आले म्हणजे त्याचे खने-पिणे औषधपाणी करणे भागच होते. चार दिवसांनी पोराचा बाप खेड्यावरून आला आणि संतपुरुष म्हणून ह्यांच्या पायाला हात लावून पोराला घेऊन गेला. कुणचे कष्ट आणि कोण संत पुरुष ! असो.

- ’रास - सुमा करंदीकर’ मधून. संकलन: सरिता आवाड, मुंबई (साभार - ’मिळून साऱ्या जणी’, मे, २०१०)

"अगदी मध्यारात्री त्गेयांच्लंया घरी गेलं तरी जेऊ घातल्या शिवाय सोडत नाही’ असं एखाद्या पुरुषाचं कौतुक होत असताना, त्या मध्यरात्री झोपेतून उठून संपूर्ण स्वयंपाक नव्याने कराणऱ्या घरातल्या कर्त्या स्त्रिचा साधा उल्लेखही नाही!

एका हिंदी सिनेमात वाक्या होतं, " प्यार करना आसान है, लेकिन निभाना मुष्किल।".

Shall we rephrase the old english saying into - Behind every great saint there is a woman ! ?

सायंस्पर्श

अजून संध्याकाळ रेंगाळते आहे; तिला पृथ्वीचा स्पर्श सोडवत नाही. तिचे सोनरेशमी हात पृथ्वीच्या गळ्यात अशकले आहेत. तिच्या स्पर्शाने वाळूसुद्धा शहारली आहे. आज माड मोरपिसे आहेत . . . आता अंधार नाही. फ़क्त त्यांचा परर्परांना होणारा स्पर्श तवढाच शिल्लक आहे. निजलेल्या मुलाच्या अंगावरचा हात आईने हळूहळू काढून घ्यावा तशी संध्याकाळ आपला हात हळूहळू काढून घेत आहे. तिची बोटे निवलेली आहेत, अबोध स्पर्शाने भारलेली आहेत

- विंदा - ’स्पर्शाची पालवी’ मधून, संकलन: सरिता आवाड, मुंबई


-साभार ’मिळून साऱ्याजणी’ , मे, २०१०

वसंत

सफ़ेद मेघ
सफ़ेद नभ
सोनेरी वर्ख

सुरेल दयाळ
सुरेख सकाळ
वासंती स्वप्न

Saturday, May 1, 2010

आयकर खातं

राजकारणाच्या पटावरचं
लई खास प्यादं
अवो ह्ये आमचं
आयकर खातं

खा खा खातं
बकाबका गिळतं
ततरी उपाशीच असतं
आयकर खातं

इकडून खातं
तिकडून चरतं
वरती चारतं
आयकर खातं

Killer Heart

A man was killed
bullet through his head
from a gun of revenge
and trigger of anger

amidst gathered crowd
of horror and sympathy
the man laid dead
with bleeding head

the killer heart stood
alone with roaring penance
like that raging sun above
behind dancing black clouds

a body was killed
a heart was stilled
black shooting star
in red bright daylight

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...