निमित्त फक्त निरांजन
देव मात्र माझा आहे,
देऊळ सारे माझे आहे
गाभाराही माझाच आहे,
घुमणारा षड्जं त्यातला
सप्तकातला तुझ्या आहे.
देवी तुझ्या स्तनांची
त्रिलोकी माया आहे,
शिवाच्या ताठपणाला
नम्रतेची छाया आहे,
गाभाऱ्याच्या घंटांचा
नाद स्तनी तुझ्या आहे
गाभाऱ्याचा घुमारा असा
स्तनार्ततेने भारला आहे
स्तन जरी तुझे असले
उभार त्यांचा माझा आहे
शिव जरी मी असलो
लीला सारी तुझी आहे
No comments:
Post a Comment