गेले काही दिवस लिहायला सुचतंच नाहीये. माझ्या काही मित्रमैत्रणींप्रमाणे मला स्वतःलाच चुकल्याचुकल्यासरखं वाटतंय. ’कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, ...’ असं एक हिंदी गाणं आहे. तसं मनाला विचारावंसं-सांगावंसं वाटतंय ,
कुछ तो कहो
कुछ भी तो कहो
क्या केहना है ?
या चुप्प रहना है? ..
अशी अस्वस्थ अवस्था आली ना की मी लगेच विचार करायला लागतो, कारणमीमांसा शोधायला लागतो. तर्काच्या गर्तेत मनाला एकदाचं टाकून दिलं की मी पुन्हा गप्प रहायला मोकळा. आता गपा रहाण्यात वाईट ते काय, अनेक लोकं जरा गप्प राहतील तर उपकार होतील असं वाटत असतं आणि इथे तर मीहून गप्प आहे. पण ्हे गप्प रहाण> फ़क्त शब्दांनी गप्प रहाणं नसतं. ही असते एक प्रकारची सर्वांगीण गप्पता, बधीरता, अगदी दगडासारखी. पण दगडच व्हायचं होतं तर मनुष्य जन्माला येण्याचे कष्ट कशाला घेतले. आता आलोच आहे तर जरा बो्लूनजगूनही घ्यावं ना.
परवा माझ्या स्वप्नात एक परी आली होती. सुंदर, सुबक, गोड, छान इ.इ. पण गमंत म्हणजे तिने डोळ्यांवर काळा गॉगला घातला होता, करुणानिधींसारखा. मला म्हणाली मी सर्व देवांच्या, यक्षांच्या वतीने तुला भेटायला आले आहे. "पण मग तो काळा गॉगल कशाला?", मी विचारलं. तर म्हणाली की तो गॉगल म्हणे तिला यमदूताने दिलाय. त्याने ढीग दिला पण हिने घातला कशाला. पण तिने मला गप्प केलं, "आत्ता मी तुला प्रश्न विचारायला आले आहे, तुझ्या प्रश्नाम्ची उत्तरं द्यायला नाही". मनात म्हटलं ठीकेय, ’असावे सादर’, नाहीतरी दुसरं कार करू शकणार होतो म्हणा.
तिने मला विचारलं, "समजा मी तूला दोन चॉईस दिले आणि त्यातला एकच निवडायला सांगितलं तर तुला निवड करता येईल का". मी म्हटलं, "असं कसं काही आगा की पिछा नसताना सांगणार. पण तु म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. ....... सर्वसाधारणपणे नाही. मला कुठलीही निवड करायला कठीण जातं कारण हे किंवा ते या्पेक्षा हे आणि ते असंच मला आवडतं. पण तसं माझ्याबाबतीत काहीच ठामपणे सांगता येत नाही. कधी कधी मी निवड करू शकतोही, करतोही. त्यमुळे तू हवंतर प्रयत्न करून बघ."
"ठीकेय. पण खरंतर आत्ता तुला निवड करायची किंवा नाही करायची यातली निवड करायचं स्वातंत्र्य नाहीचये. पण ते असो गोडीगुलाबीत जमलं तर जबरदस्ती कशाला, नाही का?", परी म्हणाली. मला ते अगदी पटलं, "बरोबर आहे. त्यामुळे तू आधी विचारून बघ. काय होतंय ते आपण नंतर बघू."
"तुला आता, तुझ्या मृत्यू्ची निवड करायचीय. एकतर तुला क्षणार्धात, या क्षणी मृत्यू येईल. कुठल्याही वेदना नाहीत, दुःख नाहीत, एवढंच काय ही आपली प्रश्नोत्तरही तुझ्या आठवणीत राहणार नाहीत. अगदी शंत मृत्यू. आत्ता या जगात तर लेगेच त्या जगात!किंवा दुसरा चॉईस आहे तो प्रलंबित मृत्युचा. तुला पाहिजे तितका सावकाश तू कणाकणाने क्षणाक्ष्णाने मरशील. भरपूर यातना तुझ्या वाट्याला येती्ल. त्या काळात पाहिजे तितकी सुखही तू उअपभोगू शकशील. काय ती निवड तुला आता ताबडतोब करायचीय. एकदा निवडलंस की मग बदलता येणार नाही. .... बोल पटकन, मला वेळ कमी आहे".
मी म्हटलं, "अगं. एव्हढा गहन प्रश्न आणि इतक्या फ़टकन कसं सांगणार. मला निदान एका दिवसाची तरी मुदत लागेल. उद्या परत ये अशीच स्वप्नात. ्तेव्हा नक्की सांगतो."
"नाही, ते शक्य नाही. आज आणि उद्यामध्ये तुला काहीही फ़रक पडणार नाही. उलट तुझा गोंधळ मात्र वाढेल. अशा प्रश्नांची उत्तरं आतून स्फ़ोटासारखी एकदम स्फ़ुटतात. मी तुला डोळे उघडू देणार नाही."
म्हटलं, " बरं, थांब, सांगतो थोड्या वेळात, डोळे न उघडता, झोपेतच." इतक्यात तिचं लक्ष नसताना माझे डोळे अचानक आपोआप उघडलेच. घामाने निथळत मी जागा होऊन गादीत बसलो होतो. थोड्या वेळाने जरा कोरडा झाल्यावर मी डोळ्यांची उघडझाप करून बघितली, स्वतःलाच चिमटे काढून बघितले. मी जागा तर होतोच, पण जिवंतही होतो. जरा शाम्त झाल्यावर मनात वि्चारचक्र सुरू झालं.
इकडे तिकडॆ, खालीवर, आतबाहेर अशी अनंत हेलकावे, अनंत आवर्तनं झाली असतील, त्यातून हळूहळू एक विचारचित्र समोर दिसायला लागलं. आत्ता, या जन्मी माणूस म्हणुन जन्माला आलोय. अशी संधी पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. कदाचित नाहीही मिळणार, किंबहुना नाहीच ्मिळणार ही संधी पुन्हा असंच धरून चालायला हवं. मग काय दःखाच्या, वेदनेच्या भितीपोटी ही एकमेवाद्वितीय संधी हातची सोडयची म्हणजे मोठाच करंटेपण होईल. आपल्याला दुःख होतात कारण आपल्याकडे संवेदनशील मन आहे, आपण प्रेम करू शकण्याइतके भाग्यवान आहोत, आपल्याला वेदना होतात म्हणजे ते सोसण्याइतकं आपलं शरीर सक्षम आहे. ही अ्मूल्या जाणीव जर त्यातून आपल्याला मिळत असेल तर त्यपासून पाळायचं कशाला. शिवाय त्याबदल्यात बोनस म्हणून आनंद म्हणून सुख, आनंदही मिळणार आहेच की. झालं, ठरलं तर मग! माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणूस म्हणूनच जगू आणि माणूस म्हणूनच मरू.
हे ठरल्यावर मन पूर्ण प्रसन्न शांत झालं. मला न कळत डोळे मिटले आणि झोपही लागली. अगदी गाढ. आत्तच थोड्यावेळपूर्वी जागही आली. तेव्हढ्या झोपेत काही ती परी पुन्हा स्वप्नात आली नाही. मजा करत हॊती की काय माझी? नाही, मला नही वाटत तसं. ्ती नक्की येईल, उद्या रात्री नक्की येईल. पण आता ती कधीही आली तरी हरकत नाही. माझं उत्तर ठरलेलं आहे !
तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे माझं उत्तर? तुमचं उत्तर हेच असतं?
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
A lover deeply in love said to beloved, "Oh, my dear, I can't live without you". The beloved deeply in love too, replied, ...
-
In the wee hours of early morning a sweet cute puppy was born on a street. Next morning an equally sweet and cute young girl woke up to the ...
-
Received this in an email and found worth sharing ::::::: mnmlist: 10 essentials I was reading a series in GQ called 10 Essentials where a d...
1 comment:
स्वप्न आपल्या मनाचा आरसा असतात..तुमच्या मनातले विचार कुठल्या ना कुठल्या स्वरुपात तुमच्या स्वप्नात येतात. तुम्हाला उत्तरं मिळवून द्यायला. आणि झोपेतसुद्धा आपलं मन तेव्हढंच संवेदनाशील असतं, कुठचाही अंकुश न ठेवता निर्णय घ्यायला. माझा अनुभव असा आहे की मला बरेचदा स्वप्नातंच उत्तरं सापडतात.
तळ गाठ एकदा
ये वरती निघोनि
तुझी तू नसशीलच
असशील दुसरीच कोणि...
तुमचं उत्तर तुम्हाला सहजपणे मिळालं नसणार हे मला जाणवलं !! पण उत्तर एकदम बरोबर. शंभरावर एकशे एक मार्कस् :)
मलाही हेच उत्तर द्यायला आवडेल !!
Post a Comment