Saturday, August 29, 2009

Silence

silence speaks
words speak silence
empty words, hollow words
useless, worthless words
words aplenty, in multitude
a dense crowd, crowded crowd
without soul or a heart

I cherish this silence
i relish this culture
culture of being silent
speaking in silence

Wednesday, August 19, 2009

ठसे

रेतीवरती उठवत ठसे
मस्तित मी चालत असे
राहतील ठसे जसेच्या तसे
मागच्यांना दिसतील असे

पुढे मी मागे ठसे
जितकी धाव तितका फसे
नाही मी फ़क्त ठसे
मागच्यांना दिसतिल असे

हळूच लाट अलगद येते
येऊन ती निघून जाते
कोण मी कुठले ठसे
मागच्यांना काहीच नसे

Thursday, August 6, 2009

श्रद्धा-अंधश्रद्धा आणि भारत-पाक

भारत आणि पाकिस्तान जुळी भावंडं. एकाच उदरातून एकाच वेळई जन्मलेली. एकाच मुशित घडलेली. एकसारखी दिसणारी, एकसारखी वागणारी, एकसारखा विचार करणारी, एकसारखॆ भाव असणारी. त्यांच्यात फ़रक करण कठीण असतं, त्याम्चा त्यांनाही. अगदी जमिनीवर सीमा काधण्यासारख्या साध्या गोष्टीतदेखील त्यांना धड फ़रक करता आलेला नाही. दोन्ही देशांमधली अर्धी सीमाच ते नीट आखू शकले आहेत.

ही दोन्मोही भावंड मोठी होता होता त्यांच्या दिशेत एका अंशाच्या एका शतांशाचा फ़रक पडला आणि पुढे जाऊन त्यांचे मार्ग
कितितरी वेगळे दिसायला लागले.

श्रद्धा आणि अंधश्राद्धा या जुळ्य़ा बहिणींबाबत हे तंतोतंत लागू होतं. मुलींमधल्या भारत पाकिस्तान. इतकं साम्य की एकीच्या ऐवजी दुसरीशी कधी बोलायला लागलो कळतं नाही. बोलता बोलता या पायावरून त्या पायावर (स्वतःच्याच) जोर दिला तरी लगेच एकीऐवजी दुसरीशी बोलण सुरू होतं इतक्या त्या जवळ जवळ असतात.

अंधश्रद्धेमधले दुर्गूण, दुर्भाव, दुर्हेतू निवडून काढून टाकून तिचं शिद्धीकरण करण्याचे प्रेयत्न शतकानुशतकं चालू आहेत पण त्याला यश आलेलं नाही. थोडी अनुकंपा, थोडी सहृदयता, थोडं प्रेम, थोडी शाश्वती मात्र खूप काही करून जातं असा मात्र अनुभव आहे.

Tuesday, August 4, 2009

मर्ढेकरांची कविता

शिशिरागम

शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे
इवलीं सुकोमल पाखरे,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे!


अब्द अब्द

किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
.
.
कधी लागेल गा नख
तुझें माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...