शिशिरागम
शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे
इवलीं सुकोमल पाखरे,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे!
अब्द अब्द
किती पायी लागूं तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
.
.
कधी लागेल गा नख
तुझें माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !
No comments:
Post a Comment