Sunday, February 28, 2010

बंदिवान

कृष्णविवरात सूर्य
नपुसंक तळपतोय

ओथंबला पान्हा तरी
बाळ उपाशी रडतंय

सागरात खलाशी
तहानला झुरतोय

वक्षांवरचे स्पर्शरोमांच
उभेच थिजून गेलेत

स्वपुच्छ पकडून
कुत्रा पळतोय

बंदिवान हे सारे
या नियतिचे,
मनोवृत्तीचे
बद्धकृती

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...