विश्राम बेडॆकरांनी एका ठिकाणी म्हटलंय, "ध्वनीची एक सूक्ष्म, अत्यंत अचपळ, अतिशय लाजाळू, लपकती आणि भित्री प्रकाशरेषा"! एका इंद्रियाचा अनुभव इतर इंद्रियांनी घेता येणं ही तर एक प्रकारची अनुभूतीच आहे. काहींना ते जमतं. पण आमचं बघा. . . सगळा आनंदच आहे. ज्या त्या इंद्रियाचा अनुभव त्या त्या इंद्रियाने सुद्धा धड अनुभवता येत नाही.
एकदा कुमार गंधर्वांच्या मैफिलीत माझा शेजारी अचानक विव्हळून ओरडता झाला, " . . अहाहा !!!!" मी काळजीने त्याला विचारलं, "काय झालं? ठीक आहात ना". यावर त्याने माझ्याकडे ज्या नजरेने बघितलं ती शब्दात वर्णन करता येणं केवळ अशक्य आहे. त्यानंतर अनेक वर्ष जावी लागली, अनेक अनुभव-अनुभूतींमधून तावून-सुलाखून निघावं लागलं, तेव्हा कुठे कळलं की त्या माणसाचं ते ओरडणं हा हृदयविकाराचा झटका नव्हता. तो एक हृदयाच्या अगदी आतून आलेला झटका नक्कीच होता. विकार नव्हे तर साक्षात्कार होता!
ध्वनीची प्रकाशरेषा, मधुर स्पर्श हा दोन इंद्रियांचा मिलाप झाला. पण त्याच्याही पलिकडे जाऊन लाजाळू, लपकती हे भावानुभव ऐंद्रिक गोष्टींमधून घेता येण्यासाठी मनाची तरलता, लवचिकता, मोकळेपणा लागतो. हे जेव्हा जमायला लागतं तेव्हा आपण स्वतः देवच होतो एक प्रकारे. देवाने दिलेल्या इंद्रियांच्या मर्यादा नुसत्या ओलांडतच नाही तर आपण एक प्रकारे आपलं स्वतःचं अतिंद्रिय विश्व निर्माण करतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलाय . संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला . सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती ...
No comments:
Post a Comment