हा ओला खडक
अथांग सागर
आणि थोडासा मी.
एव्हढंच काय ते देवाचं
बाकी उरला नुरला मी
ह्या उसळत्या लाटा
घोंघावणारा वारा
सभोवतालचं वादळ
त्यात उडणारी नाव
वारा भरलं शीड
वादळ पिणारा मी.
सारं काही माझंच
सारं सारं माझं
त्यातला देवही माझा,
मलाच नसतं बनवलं
तर काय बनवलं त्यानं
No comments:
Post a Comment