बुवा मरणासन्न
विव्हळत होते
तेव्हा कोणी कुत्रं विचारत नव्हतं
आता ते
मेल्यावर मात्र
दुखवट्याचा कोण कोलाहल !
*********************************
प्रेम
आहे, प्रेम आहे म्हणत
सारे आयुष्य निघून गेले
प्रेम माग माग
मागताना
प्रेम करायचे राहून गेले
*************************************
कान उघडे आहेत
ऐकत मात्र नाहीये
डोळे ओले आहेत
रडत बिल्कूल नाहीये
*************************************
तू हवीस यात न
पाप
तू नकोस यात न पाप
पण हवी असताना
नकोस तू
नको असताना हवीस तू
यातच पाप
No comments:
Post a Comment