उणी पुरी माणसं अनेक
येतात एकत्र
करतात उणे अधिक
बनतं त्यांचं शहर
उणं पुरं एक
उणी पुरी शहरं
अशीच अनेक
येतात एकत्र
होऊन उणे अधिक
बनतो त्यांचा देश
उणा पुरा एक
उण्या पुऱ्या माणसांच्या
उण्या पुऱ्या शहरांचा
उणा पुरा देश
अशा या देशाच्या
अशा ह्या शहरांत
कुठे गेली माणसं
ज्यांचा बनला देश
देशातली अशी माणसं
बघतात मागे वळून
दिसतं फक्त शहर!
कुठे गेला जो
त्यांचाहोता देश
No comments:
Post a Comment