Thursday, December 17, 2009

जुन्या सवयी

गवत उपटून टाक्लं तरी
झाडं छाटून टाकली तरी,
तंतू दटून राहतातच
बिया लपून राहतातच,
पाण्य़ाची वाट पहात
संधीची वाट पहात,

अलगद रुजतात
सभोवार मुरतात
पुनःश्च फ़ोफ़ावतात,
म्हणून तर अनुभवी माळी म्हणतात
सतत मशागत करत रहावं लागतं
नाहीतर
बागेचा पुन्हा माळ व्हायला
वेळ नाही लागत

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...