Sunday, September 21, 2008

ऊब आणि आशा

एक चंद्र पुनवेचा
निघाला द्यायला ऊब
आपल्या लख्ख डोळ्यांनी
कुडकुडणारया प्रियेला

पण ठंडी इतकी खट
हुडहुडी थाम्बेचना
कितीही दिला ऊबेचा प्रकाश
कितीही ओतली माया

झाली प्रेयसी निराश
झाला चंद्र हताश
असहाय मिटत डोळे
झाला कळोखी आवस

पाहून सख्यास हताश
आल्या तारका चमकत
घालून हातांचा पिंगा
ठेवले ठंडीस बाहेर

जाणून मैत्रीची साथ
पाहून प्रियेच्या आशा
पालवी चंद्राचा उल्हास
बेतसे पुनवेचा प्रकाश

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...