खजुराहो मंदीरावरची कामशिल्पे पाहिली आहेतच बऱ्याचदा फ़ोटो-चित्रांतून. पण नुकतेच खजुराहोवरचे ओशो रजनीशांचे भाष्य ऐकिवात आले. खजुराहो ्मंदिरात आत अजून भाग आहेत, एकात एक असे. कामशिल्पे फ़क्त बाहेरच आहेत. आतमध्ये वेगळी शिल्पे आहेत. सगळ्यात आतल्या गर्भगृहात तर काहीच शिल्पकाम नाही. काहीकाही योगायोग अगदी योग्यवे्ळीच होतात असं वारंवार जाणवतं, त्यातलाच हा एक योग. मला ही कविता सुचली आणि लगेचंच खजुराहोबद्दल कळलं. तर या बाहेरच्या संमुक्त कामशिल्पांपासून ते आतल्या रिकाम्या भिंतींच्या गर्भगृहापर्यंतच्या संपूर्ण मंदिराला ही कविता अर्पण.
तू विचारलंस
आठवतंय काही?
म्हणजे काय
सगळं सगळं आठवतंय
ते आरक्त ओठ
ते मत्त डोळे
ते उन्नत उरोज
ते आसक्त बाहू
सगळं सगळं आठवतंय
ते उंकार हूंकार
माझ्याकडे झेपावणारे
ते आसूस वक्ष
टपोरे स्तनाग्र
माझी बेभान
संपूर्ण बिलग
सगळं सगळं आठवतंय गं
नुसतं आठवतच नाही
क्षणक्षण जगतोय ्मी
अक्षरशः क्षणोक्षणी.
आता तू विचारतेयस
अजून काही आठवतंय का,
या आठवणींच्या पलिकडलं
त्या शरीरांच्या आतलं?
काय असतं गं
शरीरांच्या पलिकडे
शरीरांच्य़ा आतमध्ये?
काय असतं .... ?
काही असतं ?
1 comment:
जिस्म की बात नही थी उनके दिलतक जाना था
लंबी दूरी तय करनेमें वक्त तो लगता हॆ..
Post a Comment