कुठली वाट आपली, कुठली वाट तुपली
कुठल्या वाटेवरून आलोय, कुठलीवर चाललोय
अशीच एखादी वाट
मनातून उमललेली
तुझ्यापर्यंत पोचलेली
मला न घेताच गेलेली
असाच एखादा तू
वाट होऊन आलेला
वाट दाखवून गेलेला
वाट पहात राहिलेला
अशीच एखादी तू
वाट काढत शिरलेली
वाट मळवत चाललेली
वाट पहात ठेवलेली
1 comment:
वह बेखयाल मुसाफ़िर मॆं रस्ता यारों
कहा था मेरे बसमें उसको रोकना यारों..
तुझी कविता फ़ार आवडली.. वाटा.. नावाची मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे.. आठवते ?
Post a Comment