Thursday, January 1, 2009

फ़ुटेलंच कधीतरी, एक कोवळी पालवी

स्वच्छ निळ्या आकाशावर
लख्ख तळपत्या सूर्यावर
त्यात बागडणाऱ्या मनावर
दूर क्षितीजावरच्या
काळ्या मळभाची सावली

नीट निरखून पहा
इवला पांढरा ठिपका
मनमोकळा विहरतोय
गर्द काळ्या पार्श्वभूमीला
आनंदाची झालर देतोय

नाही गं नाही दिसत
कोणीच दिसत नाही तिथे
नको तो प्रकाश नि ती सावली
नको ते आकाश नि ते मळभ
बसतो मी असाच

पंखांत तोंड खुपसून
किंवा शहामृग होऊन
निष्पर्ण झाड होऊन
फ़ुटेलच कधीतरी
एक कोवळी पालवी

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...