Thursday, January 15, 2009

आधुनिक रामायण

कवी: संगीता परांजपे
(परवानगीने पुनर्पोस्ट)>>>>>>>>>>>

कैकेईने वर मागितला, जानकिरामाला वनवासी धाडा
दशरथाचा नाइलाज झाला, जा बाबा वेगळी चूल मांडा

रानि वनि काटे कुटे, खाच, खळगे
जंगलात वेगळे काही असते का कुठे?

जानकी म्हणे वनवास हा संपणार कसा आणि कधी?
असेल का नशिबी मऊ उशी आन् पराची गादी?

तिला हवी होती मृगाची मखामली चोळी
राक्षसी वृत्तीला बळी पडली भोळी

पण जानकी जवळ होता श्रीराम
इकडे मात्र खोटा दाम

खोटा दाम चालेना
लंकेतून सुटका होईना

जटायु नाही, पवनपुत्र ही नाही
एकीकडे आड आणि दुसरीकडे खाई

आधुनिक जानकी सज्ज झाली
शक्ति युक्तिची अस्त्रे परजलि

दोनच हात, पण दशाननाशी लढली
शूर्पणखेला अद्द्ल घडवली

लंकेतून सुटली, आयोध्येला आली
संशय कल्लोळाने जखमी झाली

धोब्याचे धुपाटणे घातले त्याच्याच पाठीत
लोकांची बोलणी टाकली वाळीत

जिद्द पेटली, मनात सल
आग्निला ही बसली झळ

तडक फिरली माघारी
रामाचा अंकुर वाढे उदरि

ऋषि तुल्य पित्याने दिली साथ
जुळी बाळे जन्मजात

लव आणि कुश बारसे केले
पित्रुछत्राला पारखे झाले

लवांकुशाचे धरले हात
कर्तव्याला चुकले ते कसले हो तात?

एकले पणचे व्रत घेतले
लवांकुशाला सुसंस्कृत केले

अर्थार्जन केले, ज्ञान दिले
संगणकाचे बोधामृत पाजले

व्यवहाराचे भान दिले
जग जिंकायला तयार केले

निश्चयाने साधना केली
लवांकुश बाळे मोठी झाली

लवांकुशा नि मग घेतला वेध
जेव्हा सुटला अश्वमेध

जानकीची तपश्चर्या फळाला आली
अश्वमेधाची सांगता झाली

लवांकुशानी कार्यालय थाटले.
श्रीराम कॉंप्यटर्स नाव दिले

जानकीच्या मनी मामतेचा धागा
पण तिच्या नावाला सुद्धा नव्हती जागा

नाव वाचून पडली चाट
मनात बांधली खुणागाठ

ती म्हणे आम्ही जातो आमुच्या गावा
आमुचा राम राम घ्यावा

धरणी मातेला जोडले हात
घे म्हणाली मला पोटात

काळ्या आईने घातली समजूत
तुझे कार्य संपले नाही अजुन

बोध घ्या म्हणाव सारे जन
यालाच म्हणतात 'रामायण'.


By Sangeeta Paranjape

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...