Thursday, January 8, 2009

सल

कितीही केला यत्न तरी
सल काही निघत नाही
रंग गेला उडून तरी
पीळ काही सुटत नाही

सूर सगळे लागले तरी
बेसूरी आतली जात नाही
माझ्या असूरी भावांची
सुरसूरी जात नाही

निवांत शांत जंगलात
वणवा कुणी पेटवल्यावर
जंगल बेचिराख झालं तरी
जमिनीची धुमस जात नाही

आलं मळभ निघून गेलं
आकाश मोकळं स्वच्छ झालं
एक इवला मेघ मात्र
पाठ नभाची सोडत नाही

एकदा आलेला राग
पूर्ण कधी शमत नाही
कितीही केला यत्न तरी

सल काही निघत नाही

1 comment:

Ruminations and Musings said...

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रह्स्य कोणाला कधी कळणार नाही..

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...