Sunday, February 8, 2009

काळ्या सावल्या

सावल्या सानुल्या
मनासोबत राहिल्या
नवे खेळ खेळत
सुखदुखत राहिल्या

कधी पुढे कधी मागे
कधी लांब कधी छोट्या
रुप बदलत राहिल्या
साथ देत राहिल्या

कधी काळ्या कधी पांढऱ्या
कधी निळ्याही झाल्या
रंग बदलत राहिल्या
काळवंडत राहिल्या

2 comments:

Ruminations and Musings said...

माणसे गेली तरीही सावल्या उरतात मागे
हे उन्हाचे खेळ सारे, चालले उरतात मागे..

असे काहीसे सलीलचे संधिप्रकाशात मध्ये गाणे आहे.. तुझी कविता कळली नाही..

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

कळली मलाही फ़ारशी नाहीये. माझ्या सावल्यांकडे मी बघतो तेव्हा अनेक भावछटा मनात हेलावतात. तरंगतात, स्फ़ुटतात. त्या शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांना एकच एक रंग नसतो, रुप नसतं, आकार नसतो, भाव नसतो .....

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...