Sunday, March 15, 2009

श्री / सौ - नावबदल

मुहूर्तावर लग्न लागले
कार्य फ़ार उत्तम झाले
पाहुणे रावळे खूष झाले
पंचक्रोशीत व्याह्यांचे नाव झाले

सगळं छान सुंदर होऊन
पडद्यामागे काही घडतय का
अशा आनंदी मंगल प्रसंगी
वरमातेच्या डॊळ्यात पाणी का

असं कधी घडलं नाही
असं कुणी करत नाही
राजेश रमेश पवारचा कधी
राजेश वीणा नेने होत नाही

एव्हढा याला जन्म दिला
राब राबून मोठा केला
आता हिच्या नादी लागून
आमचंच नाव पुसून टाकतोय

मुलं नाव लावणार काय
वंशाचं नाव चालणार कसं
त्यातल्या त्यात एकच बरं
हिला करंटीला मुलगा कसला होतोय

2 comments:

Ruminations and Musings said...

आज सकाळच्या मुक्तपीठ मध्ये एका बाईने तिच्या नातलगाचे लग्न ठरताना एका मुलीने कसे नखरे केले हे लिहिले आहे.

’गंमत म्हणजे एक काळीसावळी मुलगी presentable नाही म्हणून आम्ही नाकारली’ हे लिहिताना बाईंनी तो मुलगा presentable नाही म्हणून एका मुलीने नाकारला.. हे त्या मुलीला नावे ठेवताना लिहिले आहे.

एकूण काय, मुली नेहमी presentable असाव्यात.. मुलांकडून मात्र तशा अपेक्षा नकोत.. जमले तर वाच.

तुझी कविता आवडली.

Harshada Vinaya said...

[:)]

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...