चारदोन लाथा खाऊन
शरीराचं फ़ार काही बिघडत नाही
आसवं पूर्ण आटवून टाकून
मनाचं काय होतं
कल्पना आहे का तुम्हाला
ताकदवान असणं
सुखावह असतंच असं नाही
ताकदीचंच मोठ्ठ ओझ असतं
वेताळासारखं सतत मानगुटीवर
मरेपर्यंत तिथेच
रडतोस काय मुलीसारखा
लाजतोस काय बाईसारखा
घाबरतोस काय शेळपट
मान कशी ताठ पाहिजे
डोळ्यांत सारखी जरब पाहिजे
कोणासम कोणी व्हावं
तुम्हीच पहा
मैदानातला दगड बरा की
कैदेतली स्वच्छंदी बरी
तुम्हीच ठरवा
Wednesday, March 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
Privacy A few years ago there were huge debates world over about net neutrality. It was about whether service providers, search engine...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
1 comment:
ofcourse like ardhanarinateshwar... not loosing one's special character, yet trying to be as humane as possible.
Post a Comment