सकाळी प्रभात रस्त्यावरून जाताना अचानक लक्षात आल की त्या नेहमिच्या हिरव्या कोपऱ्यावर एक बंगला आहे. आज तिथली हिरवाई पूर्ण छाटूण टाकली होती. सुनसान ओकंओकं दिसत होत, एका कलेवरासारखं. खरतर आता तो बंगला उरलाच नव्हता. तिथे होतं ते त्या जुन्या बंगल्याच नुसतं कलेवर. थोड्याच वेळात मणसं जमतील, तिरडी बांधतील आणी ओंकारश्वरावर घेऊन जातील. तिथे उरेल फ़क्त एक आठवण, थोडा वेळ उदासी. माझ्यासारखे येणारे जाणारेही थोडेसे हळ्हळतील, क्वचित डोळ्यांना रुमालही लावतील.
आणि मला आठवला पुलंचा अंतू बर्वा. बेंबट्याला सांगणारा सोडून गेलेल्या सवंगड्यांच्या गोष्टी, त्यातून वाटणारी हुरहूर. भरभरून जगलॊ, मनसोक्त प्रे्म दिलं-घेतलं, अंगाखांद्यावर लोभस तान्ही खेळवली. आता परतीचा रस्ता दिसायला लागलाय, तोसुद्धा चालायला पायांत ताकद उरेल की नाही सांगवत नाही. अशी संपृक्त समृद्ध फ़ळं झाडावरून पडून गेल्यावर काय वाटत असेल त्या झाडाला! काय वाटत असेल आजूबाजूच्या फ़ांद्यांना, पानाफ़ळांना. त्यावर राहणाऱ्या, जेवणाऱ्या पक्ष्यांना.
एक घर, एक वास्तू म्हणजेही अशीच व्यक्तीच की. किती आआठवणी. तिच्या स्वतःच्या, मुलाबाळांच्या, नातवंडपणतवंडांच्या, शेजारपाजारच्या, अख्ख्या प्रभात रस्त्याच्या, एका मावळत चाललेल्या संस्कृतीच्या!
असो. आलेलं कधीतरी जाणारच. त्याचं ना दुःख, ना आनंद. पण जाणारा जाताना आपण त्याच काही ठेवून घेतोय का, घेतलं तर काय़ ठेवून घेतोय. निदान आठवणी तरी - लोणच्या-मुरंब्या सारख्या मुरलेल्या. ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
A lover deeply in love said to beloved, "Oh, my dear, I can't live without you". The beloved deeply in love too, replied, ...
-
In the wee hours of early morning a sweet cute puppy was born on a street. Next morning an equally sweet and cute young girl woke up to the ...
-
Received this in an email and found worth sharing ::::::: mnmlist: 10 essentials I was reading a series in GQ called 10 Essentials where a d...
4 comments:
रोज फ़िरायला गेलो की असे कधी छान किंवा कधी विषण्ण करणारे अनुभव येतात. तू लिहिले आहेस मात्र एकदम nostalgic.. मन व्याकुळ करणारे.
परि स्मरते आणि व्याकुळ करते माजघरातील पणतीची वात.. अशी काहीतरी कविता आहे.. !
आजंच नेमका हा विचार स्पर्शून गेलेला..नेहमीच्या रस्त्यावरचं एक झाड तोडलेलं दिसलं म्हणून, तर ते बरोबर मध्यभागी असलेलं,नकळत लोकांना divider सारखे guide करतेय असंच वाटायचं..
ashya baryachgoshtinchi savay asate najarela.. lahanpasun va barach kaal baghat aalelya goshti ekadm nahishya hotaat.. tevha tras hotoch.. vel badal accept karayalaa lavate.. aani apan manat aso va naso pudhe jat rahato .. tu mhanalas tashya aathavani japato..
काही बदल कितीही चांगलेवाईट असले तरी अनिवार्य असतात. पण काही बदल असे असतात की ज्यांची दिशा आपणच ठरवतो, बदलतो. समाजाने ठरवलेल्या अशा काही बदलांचा दुहेरी त्रास होतो. एक म्हणजे काहीतरी सुंदर निघून चालंलय आणि त्या जागी जे येणार आहे ते सुंदर नसणार आहे, ते ज्या गोष्टीचं प्रातिनिधित्व करणार आहे, ती गोष्ट तर निश्चित धोकादायक आहे.
Post a Comment