Wednesday, April 15, 2009

काय सांगायचंय मला .....

काहीतरी म्हणायचंय मला
काहीतरी सांगायचंय....

अतीव वेदना की अत्युच्च आनंद
बेभान वासना की अथांग समाधान
माहीत नाही नक्की
काय सांगायचंय मला
पण एव्हढं मात्र कळतंय
काहीतरी म्हणायचंय मला
काहीतरी सांगायचंय....


बेधुंद दग्ध कामाक्षीचा
अस्फ़ुट हळवा हंकार
प्रसूत वेदनेतून प्रसवतो
आशेचा रडता अंकूर
प्रत्ये्क जन्मासह जन्मते
मृ्त्यूची अनिवार्य घटिका
मरणामधून उमलते
नियतीची आवर्तनलतिका

जन्मलेल्याचा मृत्यू नक्की
मेलेल्याला जन्म निश्चित
जन्माआधी काय अ‌‌न‍‌
मरणानंतर काय
उघडझाप, आकुंचन प्रसरण
अनादी अनंत अविरत आवर्तन
अर्थ अनर्थ कशाला अर्थ
काहीही म्हटलं तरी
काय त्याला अर्थ
तरी एव्हढं मात्र नक्की
काहीतरी म्हणायचंय मला
काहीतरी सांगायचंय

आज जे कोमेजलंय
उद्या हिरवं उमलेल ते
आज जे बहरतंय
उद्या मान टकेल ते
काही नाही स्थिर, ना काही स्पष्ट
अद्भूतातून असा निघतो अर्थ
स्पंदनं आवर्तनं अविरत चालू
किती त्यांना पाहू आणि किती जाणू
जेव्हढं केव्हढं उमजलंय
त्याने सारं मन भारलंय
ते व्यक्त करायचंय मला
तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय
माहित नाही जमलं किती
जे मला म्हणायचंय
जे मला सांगायचंय

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...