Tuesday, May 25, 2010

बारा कोस

दर बार कोसांवर भाषा बदलते म्हणतात. भाषा ही नदी सारखीच असते एखाद्या. इथे अशी दिसते, तिथे तशी दिसते, इथे अशी वाटते, तिथे तशी . . . .
पण आजकालच्या standardization च्या जमान्यात लोकांना ना अशा बारा कोसांची पर्वा ना इच्छा.

’अनुभव’ च्या हाराष्ट्र विशेषांकात त्यांनी या बारा कोसांना नेमकं शब्दांत पकडायच प्रयत्न केला आहे. निवडक लोकांना त्यांनी ’आमची माणसं’ हा विषय देऊन त्यांच्यात्यांच्या बोली भाषेत लिहून घेत्तलं. महाराष्ट्रातच्या पूर्वपश्चिम, उत्तरदक्षिण कोपऱ्यांतून कोकणि, वऱ्हाडी, खानदेशी, मराठवाडा, कोल्हापूर-सोलापूर, नंदुरबारचा सातपुड्याचा भाग अशा अनेक बोलीभाषेंमधलं बोलणं वाचताना जाणवतं की म्हटलं तर भाषा एकच आहे पण तिची किती सुंदर सुम्दर रूपं आहेत ही! अशा सगळ्य़ांना एकाच प्रमाणात बांधणं पूर्णपणे चुकीचं आहे. उलट असे मार्ग शोधणं आवश्यक आहे की ज्यायोगे आपल्या सर्व बोलीभाषा जिवंत बहरत्या तर राहतील आणि त्याच वेळी सर्व बोलीभाषां बोलणऱ्या लोकांना एकमेकांशी संवादही साधता येईल.

3 comments:

sharayu said...

अनुभवचा हा अंक कोठे मिळेल? किमान हा अंक जालावर टाकता येईल का?

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

'Anubhav' website:
http://www.eanubhav.com/Anubhav%20Issues.htm

Thie contact information too is available on the same website

FortArnala said...

Puneri 12 akdyaawar itke fida kaa astaat?

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...