Monday, July 26, 2010

मेघ . . . एक सद्य

मेघ हा एकमेव पुरुष असावा जो जन्म देतो,
तो जन्म देतो पाऊसाला

मेघ एकमेव आई असावा जो जन्म देतो अनाकार
कधी इवलूसं सशुल्याचं बाळं, तर कधी देवमाशाइअतकं अजस्त्र पिल्लू

मेघ एकमेव आई असावा जो जन्म देतो निःसंख्य
कधी एकच तर कधी अनंत
********************************

म्हटलं तर काव्य कल्पना आहे
ना काही आकार अलंकार
ना काही साचा ना ढाचा
म्हणून पद्य म्हणवत नाही

मग गद्य म्हणावं तर
ना काही विस्तार सविस्तर
ना कुठे मुक्त विहंगन
म्हणून गद्यही म्हणवत नाही

काहिही असो कसही असो
सद्यस्थितीत मनाला भावतं आहे
म्हणजे काय तर
आहे हे असं आहे
म्हणून . . . ” सद्य’

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...