तिन्हीसांजेची अनवट वेळ
पुढे निशेचं अधिर भविष्य
लाल निळं काळं पाणी
त्यात अलवार थरथर पाऊलं
घरट्यांमध्ये झोपेची चाहूल
स्थिरावलेला अस्थिर वारा
म्हटलं तर संध्येचा आरव
म्हटलं तर शांतता निरव
डोंगरमाथी झळाळी काळी
उमले तिथून आर्त हाळी
सादेच्या त्या पंखांवर अनवट
येतेस तू हळूच अलगद
आहेस तू अन् नाहीस तू
भारलास सारा आसमंत तू
भरून भारून भोवताल माझा
कणरंध्र माझे पुलकित झाले
:
:
:
अशाच एका कातरवेळी देवाला
पृथ्वीची कल्प्ना सुचली असेल
***********************
(संपूर्ण भारून टाकते ती भारूल)
No comments:
Post a Comment