त्याच्याशेजारी, त्याच्याच वाळूवर
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून
अंगभर मृद्स्पर्शाचा मृदुशहार
तळव्यांना मऊओली चुंबनं
त्याच्या गाजेवर आरुढ होऊन
विहरणाऱ्या मनस्वी मनाला
फ़ांद्यांवर फ़ांद्या फ़ुटत जातात
फ़ांद्या फ़ांद्या पसरत जातात
मूळ बुंधाच हरवून जातो
खालची जमीन दिसेनाशी होते
नव्या पालवीत हरवत जाऊन
मूळांचा विसर पडून जातो
तो तसाच गप्प
मी मात्र विचारत राहते
तुझ्या पाण्यामध्ये भिजू
की अलवार लाटांनी मोहोरू
No comments:
Post a Comment