स्पर्श आईचा, स्पर्श ताईचा, स्पर्श बाईचा
स्पर्श वासरा गाईचा, हातास काळ्या माईचा
स्पर्श राधेस किसना, मुग्ध कानास बासुरा
स्पर्श अधरा अधीर, मनास सावळा पदर
स्पर्श कातडी जाळतो, हिची काचोळी तोडतो
स्पर्श काळजा भिडतो, ओली फ़ुंकर घालतो
स्पर्श आतून फ़ुलतो, असा फ़ुलत मुरतो
स्पर्श अंगभर फ़िरतो, हळू मनावर निजतो
No comments:
Post a Comment