Thursday, March 19, 2009

नार बनाओ जी रसिया को . . . . .

ही एक पारंपारिक बंदिश कुमार गंधर्वांनी गायलेली आहे. शब्दांइतकीच तरलता आहे त्यांच्या गाण्यात. आजच्या पुरुषांशी बरोबरी करण्याच्या युगात गोपी कृष्णाला स्त्रीरुप धारण कराय्ला निघाल्या आहेत. त्याला अगदी लेंगा-चोळी घालून, कुंकू लावून. निर्विवाद पुरुषी वर्चस्वाच्या भारतीय लोककथांमध्ये, लोककलांमध्ये असे झळकमोती अचानक सापडून जातात.

८ मार्चच्या स्त्रीदिनी कुठल्यातरी एफ़ एम चॅनलवर जाहिरातबाजी चालू होती की मुलींनो मुलांना दाखवून द्या की तुम्हीही फ़ॉर्म्युला वन रेसमध्ये इंटरेस्ट घेऊ शकता इ. इ. छानच की बरोबरी करत करत सगळ्या मुली मुलांसारख्य़ाच वागायला लागल्या तर एकांगी जग कसं वाटेल ?!

या बंदिशीसारखं अजून एक पुस्तक सापडलं, राजस्थानी लोककथांचं. मला वाटतं विनीता सावंतांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. ’द्वंद्व’ त्याच नाव. मी काही बोलत नाही त्यावर, प्रत्यक्ष वाचावंच

1 comment:

भानस said...

अप्रतिम बंदिश व गाणारे त्याहीपेक्षा वरचढ.रात्रीच्या थंड थिजलेल्या वातावरणाने खूप म्लान मनाला अचानक आनंद मिळाला. विस्मरणात गेले होते हे गाणे. अनेक आभार.

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...