Tuesday, May 19, 2009

मुकुल, . . . . . . माझा सलाम

पं. मुकुल शिवपुत्र बेपत्ता झाले आणि नंतर एका रल्वे फ़लाटावर हलाखीच्या अवस्थेत आढळून आले. या बातम्या वाचून अतिशय दुःख झाले. एका अद्वितीय कलाकाराची काय ही अवस्था ! विमनस्क अवस्थेत, विपन्न स्थितीत त्याला वावरावे लागावे. का बरं ? किती भयानक, किती दारुण ! पण काय करणार, कोण किती पुरे पडणार ?!

डोळ्यातनं ओघळलेले थेंब पुसून, मनातल्या हळहळीवर फ़ुंकर घालून मी माझ्या आखीवरेखीव समृद्ध आयुष्याकडे पुन्हा वळलो. आधीच्या घड्या सरळ करत नव्या घड्या घालायला लागलो. पण माझ्या मनावर मीच घतलेली ती फ़ुंकर विरून गेली नाही. माझ्याही नकळत तिने वावटळिचे रौद्र स्वरूप धारण केले. माझ्या आखलेल्या सरळ रेषा उधळून टाकत, नीटस इमारती उध्वस्त करत ती इतस्ततः बेभान सुटली. चोपडून बसवलेले केस तिने पूर्ण विस्कटून टाकले. गालावरचं तीट डोळ्यांवर गेलं. माझं सौंदर्य खुलवायला डोळ्यांभोवती न थांबता ते अंजन डोळ्यांत जाऊन झोंबायला लागलं. पेटाऱ्यात पार खाली दाबून ठेवलेल्या गोष्टी फ़ुर्रर्र करत वर आल्या.

समोर आलं ते जोडपं. हे जग आपल्या प्रेमाच्या योग्यतेचं नाही म्हणून हातात हात घालून कड्यावरून उडी मारणारं. मनातल्या वावटळीने त्यांना अलगद उचलून पुन्हा माझ्यासमोर आणलं. त्यांच्याशेजारी उभा राहिला. व्हॅन गॉग. मैत्रिणीने मागितला म्हणून तिला आपला कान कापून भॆट देणारा, उन्हातले तळपते रंग तसेच्या तसे कागदावर उमटावेत म्हणून तब्येतीची पर्वा न करता उन्हातान्हात चित्रे काढत डोक्यावर परिणाम होऊ देणारा. त्यांच्या मागे दूर धूसर एव्हरेस्टच्या खांद्याला खांदा लावून उभा होता कर्ण. याचकाचे खरे रूप ओळखूनही, त्याचा खरा हेतू जाणूनही आपली कवचकुंडलं दान करणारा, स्वतःच्या प्रतिज्ञेला स्मरून, आपाल्या स्वभावाला मान देऊन जीव धोक्यात टाकणारा. मनातले सारे राग, सारे अपमान गिळून टाकून कुंतीला ’तुझी पाच मुलं राहतील’ असे वचन देणारा. हा कर्णच जर नसता तर महाभारत किती अळणी झालं असतं नाही ! कदाचित मग व्यास महाभारत लिहायच्या फ़ंदातही पडले नसते.

मला भावतो तो कर्णाचा दानशूरपणा नाही तर त्याची स्वतःशी कमिटमेंट, त्याची पॅशन. इंद्राला कवचकुंडलं काढून देताना, कुंतीला वचन देताना त्याला त्याचे परिणाम पूर्ण माहित होते. तरीही तो डळमळला नाही, मागे सरला नाही. त्यानंतरही शेपूट घालून रणांगणातून पळून गेला नाही. आपल्या वृत्तिशी, आपल्या भावनांशी तो एकनिष्ठ राहिला. कशाचिही पर्वा न करता, अगदी जिवाचीही!

काय फ़रक आहे कर्ण आणि मुकुल मध्ये ?! कर्णाला दुर्योधनाने उचलून धरलं, व्यासांनी अजरामर केलं. मुकुल तर सगळ्या व्यासांपासून दूर पळतोय. आप्ल्या ऐहिक जगातली सगळीच्या सगळी बंधनं त्याने झिडकारली आहेत. पूर्ण जाणिवेने. त्याची किंमत मोजायची त्याची तयारी आहे. तो भीक मागतो ती फ़क्त फ़ुटकळ पैशाची. धनवानांचे रजगायक होण्याची निमंत्रणम त्याने नाकारली आहेत. त्यला भीक हवी आहे ती फ़क्त घासभर अन्नासाठी आणि घोटभर नशेसाठी. इतकं स्वतःच्या धुंदीत जगू शकणऱ्याला अजून वेगळी नशा का लागत असेल हे मात्र मला न उमजलेलं कोडं आहे.

नाही, यापुढे मी मुकुलच्या स्थितीची कीव करणार नाही. एक संगितप्रेमी म्हणून मला नक्कीच वाईट वाटतंय की त्याचं दैवी संगीत ऐकण्याच भाग्य आपल्या नशिबातनं दूर होतंय. पण एक माणूस म्हणून मुकुलला माझा त्रिवार सलाम. त्याच्या बेभान, बेफ़ाम, बेपर्वा वृत्तीची कणभर जरी लागण मला झाली माझं जीवन उजळून निघेल असं मला वाटतं.

2 comments:

sonal m m said...

swatahachyach nashet asnaryala dusrya kuthchya nashechi garaj kharach ka vatavi? kuthetari ha tyacha swatahacha parabhav aahe asa mala vatta...nashet jagaycha tari potacha bhan nahi sutu shakat na...ani ashi khoti nasha daivi sangitahi door nahi karu shakat na? keev tar nakoch karayla...ani je kahi sangeet aajparyanta jagala tyanni dilay tehi NILL nahi hot lagech pan...tyanni bhanavar yenahi titkach garjecha...

jui said...

sangeetachi daivi nasha asnarya manaasala aslya nashechi garajach ka bhasavi...te daivee soor ....tyacha sparsha zalela manasane asa janavarasarkha jeevan jagava ? vyasandhinatela glorify kela tari to aajarach ahe...
Thank God hee comment lihtiy tevha mukuljee sukhroop sapadale ahet ani sarkarne tyanchi kalaji ghenyachi soy hi keleli ahe. That's really good for indian clssical music.

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...