Wednesday, August 19, 2009

ठसे

रेतीवरती उठवत ठसे
मस्तित मी चालत असे
राहतील ठसे जसेच्या तसे
मागच्यांना दिसतील असे

पुढे मी मागे ठसे
जितकी धाव तितका फसे
नाही मी फ़क्त ठसे
मागच्यांना दिसतिल असे

हळूच लाट अलगद येते
येऊन ती निघून जाते
कोण मी कुठले ठसे
मागच्यांना काहीच नसे

1 comment:

भानस said...

आशय भावला. या जगाच्या रहाटगाडग्यात किती हजारो वर्षे ठसे उमटले जात आहेत अन तितक्याच वेगाने पुसलेही....आवडली.

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...