Thursday, March 18, 2010

स्वप्नातील गाव

घनदाट काळी झाडी, तीत धुकं शुभ्रगच्च
लांब कुठे देवळाच्या घंटा, त्यांची गूढ मला हाक
धुक्यात हरवली वाट, पल्याड माझं स्वप्नातील गाव

कुठलीशी एकली देवी, तिची हडळ आहे पुजारीण
नारद करे कीर्तन, त्याची आर्त मला हाक
शोधी सार भाव, कुठे माझा स्वप्नातला गाव

धुक्याची माती रस्ते, धुक्याचीच झाडे फ़ुले
धुक्याच्या अंधारात, धुक्याचीच पणती वातं
त्यात ओतीन माझा जॊव, चेतवीन माझा गाव

1 comment:

Ruminations and Musings said...

दिल चाहता हॆ मधे dimple अक्षय खन्नाच्या चित्रांवर काहीतरी त्याने आत बंद करुन ठेवलंय असे त्याची चित्रे सांगतात अशी comment करते.

तुझ्या धुक्याच्या कविता ओळीने आल्यामुळे तुला grey area जास्त दिसतो आहे असे वाटले.. कविता म्हणून आवडल्या आहेत मला..

मधे एका मित्राला अचानक त्याचे blog post वाचून जीए फ़ार वाचतोस का विचारले तर तो चाट पडला.. ते खरे होते.. असे घडते आयुष्यात..

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...