चिडवले की चिडतो
पट्कन् रुसून बसतो
रडवले की रडतो
हसवले की हसतो
डिवचले की रागावतो
थयथयाट करतो
डुंबायला आवडते
खोलीला घाबरतो
वरवर बघतो
आत शिरत नाही
दिसला पदर धरतो
चटकन् कुशीत शिरतो
मोठ्या शरीरामध्ये
इवलसं मन दिसतं
वय वाढलं तरी
मन लहानच रहातं
3 comments:
कितनी सदियोंसे कितने बरसों से जिये जाते हॆ..
आदतें भी अजीब होती हॆ.
गुलजार.
sounds like me...nice poem
झक्कास
Post a Comment