Thursday, December 11, 2008

कोटी कोटी

प्रत्येक भाषेची काहीतरी खासियत असते. तशी मला वाटतं द्वयर्थी शब्द ही मराठीची एक खासियत आहे. आता ’वाट’ ्या शब्दाचच पहा ना. वाट काढली, वाट लावली, वाट पाहिली आणि अजूनही अशा अनेक वाटा असतील.  तसाच अजून एक शब्द म्हणजे ’शहाणा’. हा ्शब्द अगदी शब्दशः शहाणा ते वेडा अशा कुठल्याही अर्थाने वापरला जातो.  इंग्रजीत पन आहे (म्राठीतले ’पण’ वेगळे). पण मराठीतल्या्सारखे द्वयर्थी, बहुअर्थी पद्धतीने वापर माझ्यातरी वाचनात , ऐकीवात नाही.

आता इंग्रजी आणि इतर भाषांच्या मेळमिसळीने ही मजा आणखीच वाढतेय. आजच ’सकाळ’ वर्तमा्नपत्रात वाचलेली ही कोटी किंवा ग्रफ़िटी बघा : लोण्याच्या योग्य  वापराशिवाय त्याचे चीज होत नाही.

पुलंना अशा कोट्या करण्याची खास हातोटी होती. ’कोट्याधीश पुल’ असं त्यांचं कोट्यांचं पुस्तकच आहे. 

गाण्याच्या भेंड्या असतात तसा एक द्वयर्थी-बहुआर्थी शब्दांचा खेळ करता येईल नाही का : कोटी-कोटी.  बघा कोणा कल्पनाधीशाला (creative mind) सुचतोय का नीट.


3 comments:

HAREKRISHNAJI said...

सकाळ मधल्या ग्राफीटी मस्तच असतात, शब्दाचे हे खेळ मजेशीरच.

पुलंनी केलेल्या कोट्या खऱ्या किती नी त्यांच्या नावावर खपवलेल्या किती हा एक संशोधनचा विषय आहे.

Pranav said...

"लोण्याच्या योग्य वापराशिवाय त्याचे चीज होत नाही."

Nice pick! Thanks for sharing that one :)

sonal m m said...

कल्‍पना मला फारच आवडली..हा माझा शब्‍द.
टोप (पातेलं ह्या अर्थी) - टोप (जिरे-टोप) किंवा टीप (सूचना)- टीप (स्‍वर टीपेचा मधली) - टीप (सुई दोर्‍याची)

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...