जेथे जातो तेथे
तू माझा सांगाती
भक्ताने परमेश्वराला, विठ्ठलाला हे म्हटले आहे. प्रत्येक जागेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक मा्णसामध्ये भक्ताला भगवंत दिसतोय. माझीही काहीशी तशीच अवस्था झालीय. पण काहीशीच. थोडा फ़रक आहे. म्हट्लं तर थोडा, म्हटलं तर मात्र अगदी मूलभूत. मला प्रत्येक देवात माणूस दिसतो. असा एकही देव मला सापडला नाही की ज्याच्या पायाला माती लागलेली नाहीय, की ज्याचा पाय कुठे कधी घसरलेलाच नाहीये, की ज्याच्य़ा देवचंद्रावर कुठे डाग पडला नाहीये.
एखाद्या महर्षीला वाकून नमस्कार करावा तर त्यांचं लक्ष पडणाऱ्या पदराकडे, अस्वस्थ मनाला आधार देण्यासाठी एका साधूकडे जावे तर तो स्वतःच इनसिक्यूअर्ड होऊन गर्दीच्या मागे लागलेला, विद्याध्यासाने गुरुसमोर बसावं तर त्यांची दृष्टी माझ्या खिशाकडे खिळलेली, मनःशांती शोधत स्पिरीच्युअल मास्टरकडे जावं तर तोच मानसोपचार तज्ञाकडून उपचार घेतोय. आदर्श म्हणून कोणाला समोर ठेवावे तर त्याची कृत्ये न कळली तरच बरे असे वाटावे. जंगजंग पछाडले पण संपूर्ण देव मला कुठे भेटलाच नाही.
माझे छोटे अनुभव व्यासांनी वैश्विक पाहिले होते. महाभा्रतभर त्यांनी देवत्वातले माणूसपण ्मांडले आहे. काही हरकत नाही, त्यांच्या समुद्रातला एक थेंब मी अनुभवतोय.
हे माणसा ....
जेथे जातो तेथे
तू माझा सांगाती.
कधी नव्हे ते हिंदू संस्कृतीचा माझा काही संबंध आहे असे वाटले. नाहीतर हिंदू संस्कृती म्हणून जे काही पहावे लागते ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलाय . संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला . सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती ...
1 comment:
hmm.. true..
Post a Comment