मशिदीसमोरून जातो तेव्हा
डोकं अगदी सडकून उठत
पहाटे चारला लाउडस्पिकरवरून ओरडतात
राजरोसपणे चाराचार बायका काय करतात
गोमातेचं मांस काय खातात
अचकट विचकट दाढ्या काय वाढवतात
दणका द्यायलाच हवा साल्यांना
रणरणत्या उन्हातला मोर्चा
थंडगार एसीमध्ये साहेब
आमच्या घट्टे पडलेल्या हातांनी
गुबवलेत ह्यांचे गोरे गाल
हातांचा हिसका दाखवायालाच पाहिजे
ह्यांना खाली खेचायलाच पाहिजे
माझ्या खांद्याला खांदा लाउन लढतोय
तो मशिदीतला दाढीटोपीवाला
खच्च भरलेल्या फलाटावर
गच्च भरलेली गाडी
आत शिरायला मी आतूर
सगळे दरवाजे बंद फितूर
आत कुम्भकर्ण ढाराढूर होते
कोणीतरी ढोसा, कानाखाली लावा
कसेही करून दार उघडायला लावा
कोनालातरी उतरायला एक दार उघडलं
मी आत घुसलो, मागून लोंढा
अनेक चपलांखाली माझे पाय होते
आणि अनेक श्वासांमध्ये माझं डोकं
बरं झालं कोणीतरी दार लावलं
नाहीतर बाहेरचे आत शिरले असते
आत जागाच कुठे अजून यायला
फूटपाथवरून अनवाणी चाललो होतो
लख्ख काचांमागचा झगमगाट पाहात होतो
एवढ्या तट्ट फुगलेल्या ढेरया
त्यांसमोर पक्वान्नान्च्या ढेपा
आमची खपाटीला गेलेली पोट
त्यांना फक्त चार दोन शित
देवसुद्धा गरिबांचा वाली नाही
भिकार्यान्नी अगदी उच्छाद मांडलाय
जिकडे तिकडे सूळसूळाट माजलाय
खंडीभर पोरं काढतात कशाला
स्वतः उपाशी तरी मणभर पोसायला
चार घास सुखाने खाता येत नाहीत
लव्हलव्हनारया जिव्हा वेडावत रहातात
छाटून टाकल्या पाहिजेत दरिद्री जिभा
ते आणि आम्ही
आम्ही आणि ते
एकाच नाण्याच्या
दोन बाजू
की
वर्तुळाला असते तशी
सगळी एकच बाजू
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
I overheard a friend talking about her. Just a few words, but so enchanting, so inviting. I got her number and immediately called her fo...
-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
No comments:
Post a Comment